संस्कारी बाबूजीवर बलात्काराचा गुन्हा दाखल

Foto


मुंबई- बॉलिवूड व टी व्ही पडद्यावर संस्कारी बाबू अशी ओळख निर्माण केलेले अभिनेते आलोकनाथ यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी  आलोकनाथ यांच्यावर कलम ३७६  अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आलोकनाथांनी १९ वर्षांपूर्वी बलात्कार केल्याचा आरोप लेखिका विनता नंदा यांनी केला होता.

अभिनेत्री तनुश्री दत्ताने 'मी टू' मोहीम छेडल्यानंतर देशभरात विविध क्षेत्रातील महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली होती. लेखिका विनता नंदा यांनीही १९ वर्षांपूर्वी आलोकनाथ यांनी बलात्कार केल्याचा आरोप केला होता. त्याबद्दलची पोस्ट त्यांनी ऑक्टोबरला सर्वांसमोर मांडली होती.

यानंतर आलोकनाथ यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप अभिनेत्री हिमानी शिवपुरी संध्या मृदुल  यांनीही केला. त्याचप्रमाणे आलोकनाथांचा हा चेहरा माहित असल्याची कबुलीही अनेक कलावंतांनी दिली होती. अगदी 'ताराफेम अभिनेत्री नवनीत निशान यांनीही आरोपांना दुजोरा दिला.

'
सिन्टा' या मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांचे प्रश्न मांडणाऱ्या असोसिएशननेही आलोकनाथ यांना नोटीस पाठवली होती. 'संस्कारी बाबूजी' अशी ओळख असलेल्या आलोकनाथ यांचा वेगळा चेहरा समोर आल्याने चाहतेही अवाक झाले.

विनता नंदा यांच्या आरोपांनंतर जवळपास दीड महिन्यांनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यानच्या काळात आलोकनाथ यांनी विनता यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला होता.